दि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)

0
2349
views

दि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)

एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट कडे सफाई कामगार या पदासाठी अर्ज केला होता. एच आर मॅनेजर ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची ट्रायल घेतली आणि त्याला पास केले. मॅनेजर म्हणाले “तू स्विपर म्हणून सिलेक्त झालास. तुझा इमेल आयडी दे मी त्यावर तुझे नियुक्ती पत्र पाठवतो”

हे ऐकून उमेदवार म्हणाला, “साहेब मी एक सफाई कामगार आहे माझ्याकडे इमेल आयडी नाही आणि कॉम्पुटर पण नाही”

“अरेरे… तुझा इमेल ऍड्रेस नाही याचा आमच्याकडे अर्थ असा होतो की तू अस्तित्वातच नाहीस. त्यामुळे मग तुला ही नोकरी मिळणार नाही”

त्यानंतर तो बेकार माणूस निराश होऊन निघून गेला. खिशात फक्त १० डॉलर शिल्लक होते. त्याला काय करायचे सुचेना.

मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने शेतकऱ्याकडे जाऊन एक क्रेट टोमॅटो विकत घेतले. नंतर दारोदार जाऊन त्याने ते सर्व टोमॅटो विकले. त्याच्यातून त्याला भरपूर नफा झाला. फक्त दोन तासांत त्याचे पैसे दुप्पट झाले. आता त्याला पैसे कमावण्याचा मार्ग मिळाला होता. टोमॅटो सोबत तो आता इतर भाज्या आणि फळेही विकू लागला.

असे करून थोड्याच दिवसांत त्याच्याकडे खूप पैसे जमा झाले. त्याला काम रोज सकाळी लवकर सुरु करून रात्री उशिरा संपवायची सवय लागली. त्याने थोड्याच दिवसांत एक टेम्पो घेतला. नंतर ट्रक आणि नंतर खास बनवलेल्या डिलिव्हरी व्हॅन आल्या. पुढील ५ वर्षांनी तो यु एस मधला सर्वात मोठा फूड रिटेलर म्हणून नावारूपाला आला.

आता तो त्याच्या कुटुंबाचे भविष्य निर्वाह प्लॅनिंगचा विचार करू लागला. त्याने इन्शुरन्स ब्रोकरला बोलावले आणि प्लान चेक केले. ब्रोकरने माहिती विचारून घेतली आणि “तुमचा इमेल आयडी दया मी तुम्हाला वर्किंग पाठवतो” म्हणाला.
हा म्हणाला “माझ्याकडे इमेल आयडी नाही”

इन्शुरन्स ब्रोकर म्हणाला “साहेब तुमच्याकडे इमेल आयडी नाही आणि तरीही तुम्ही एव्हडे मोठे साम्राज्य निर्माण केलेय, नुसती कल्पना करा, जर तुमच्याकडे इमेल आयडी असता तर तुम्ही कोण असतात?”

माणसाने थोडा विचार केला आणि म्हणाला “माझ्याकडे जर इमेल आयडी असता तर मी कोण असतो माहीत आहे का? मी मायक्रोसॉफ्ट मध्ये स्विपर म्हणून कामाला असतो”

मित्रांनो, इंटरनेट, इमेल, बी बी एम, व्हाट्स ऍप या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशावरचाही उपाय नाहीत
फेसबुक, इंटरनेट, इमेल, बी बी एम यापैकी तुम्ही कशावरही नसाल तरीही तुम्ही खूप मेहनत करून, सचोटीने काम करून, थोडे जास्त कष्ट करून यशस्वी होऊ शकता.

फेसबुक, व्हाट्स ऍप यांच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. Good morning, Good afternoon, Good night , happy birthday… म्हणून सकाळ, दुपार आणि रात्र चांगली जात नसते. ती आपली संस्कृतीही नाही. आपण काम केले तरच हे सर्व चांगले जाईल. आपले काम सोडून व्हाट्स ऍप वर अनेक तरुण तरुणी वेळ वाया घालवतांना दिसतात. आपला कामाचा दर्जेदार वेळ या गोष्टीत वाया जात असेल तर नक्की विचार करा आणि त्यासाठी जाणारा वेळ वाचवा. या गोष्टींसाठी ठराविक वेळ ठरवा.

अश्या सुंदर लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.