जगातला सर्वात मोठा सोलार पॉवर प्लांट भारतात सुरु

0
334
views

सोलार ऊर्जा

भारतात विजेची मागणी वाढत आहे पण वीज निर्मिती करणारे स्रोत हे मर्यादित आहेत. यामुळे देशात आज पण खूप ठिकाणी लोडशेडिंग केलं जातं. या लोडशेडिंग चा सगळयात जास्ती फटका कशाला बसत असेल तर ते शेती होय. याचा फटका बऱ्याच वेळी शेती उत्पादना वर पडते.या वर उपाय म्हणून भारतात जास्तीत जास्त वीज निर्मिती केल जात आहे नवनवीन स्त्रोत शोधले जात आहेत.

in__green_3822_04.jpg

सध्या वीज निर्मितीचा सगळ्यात चांगला आणि प्रदूषणरहित कोणते स्रोत असेल तर ते म्हणजे सूर्यकिरणा पासुन तयार होणारी वीज (सोलर पॉवर) होय. भारतात जगातील सर्वात मोठा सोलार प्लांट सुरु झाला आहे.हा प्लांट तामिळनाडू मधील कामुथी या ठिकाणी उपरण्यात आला आहे.या पॉवर प्लांट ची क्षमता 648मेगा व्होल्ट असून हा 10 sq किलोमीटर मधे पसरला आहे.

एकाच ठिकाणी उभारण्यात आलेला सगळ्यात मोठा प्लांट

या मुळे हा एकाच ठिकाणी उभारण्यात आलेला सगळ्यात मोठा प्लांट आहे. या अगोदर जगात सगळयात मोठा असण्याचा मान टोपाझ सोलर फार्म नावाचा प्लांट ला होता जो 550 मेगाव्होल्ट वीज निर्मिती करतो हा कॅलिफोर्निया येथे आहे.

solar-park-2.jpg

हा प्लॅंत अदांनी ग्रुप्स नि बांधला आहे. विशेष म्हणजे याला फक्त 8 महिण्यात बांधण्यात आले आहे. आणि या प्लांट ची दैनंदिन स्वछता आधुनिक रोबोटिक्स सिस्टिम करणार आहे.हा प्लांट 1लाख 50 हजार घरांना पुरेल एवढी ऊर्जा निर्मिती करू शकतो.

solar-energy-759.jpg

या सोलार प्लांट 25 लाख लहान सहान सोलर प्लेट्स मिळून बनला आहे.आणि याला उभारण्या साठी जवळपास 678 मिलियन US डॉलर (4,500 करोड)एवढा खर्च आला आहे. या प्लांट मुळे भारत 10 गिगा व्होल्ट (giga volt) वीज निर्मिती करणारा देश बनेल आणि जगात एवढी वीज निर्मिती करणारे खूपच मोजके देश आहेत.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.