वर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी

0
740
views
वर्ष 2016

बघता बघता वर्ष 2016 चा शेवटच्या दिवशी आला. या वर्षामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या काही चांगल्या काही वाईट तर काही धक्कादायक. अगदी सैराट पासून नोटबंदी पर्यंत. अश्याच काही गोष्टीची यादी खास आपल्या साठी.

10फ्रीडम 251

251 रु मध्ये मोबाईल चा साधा मेमरी कार्ड येत नाही त्यात नोएडा येथिल रिंगिंग बेल या कंपनी ने चक्क 251 रु मध्ये मोबाईल देणाची घोषणा केली होती. सर्वांत स्वस्त स्मार्टफोन म्हणून फ्रीडम २५१ कडे आणि या फोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. पण कंपनी चे दवे पूर्णपणे फोल निघाले याचे दोनही संचालकांनी कंपनी ला राजीनामा दिला आहे.

9ब्रेक्झिट

जुलै महिन्यांच्या शेवटी ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला. ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे याच बाजूने कौल दिला. आणि ब्रिटनच्या या ब्रेक्झिटने सगळ्या जगाला धक्का दिला. २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन महासंघामधून ब्रिटन बाहेर पडला याचे संभाव्य परिणाम देखील वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले.

8करून नायर त्रीशतक

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात करूण नायरने नाबाद ३०३ धावांची खेळी केली. करूणने आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या कसोटीतच त्रिशतक केले आहे. वीरेंद्र सेहवाग नंतर त्रिशतक करणारा करूण नायर भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

7जयललिता यांचे निधन

एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली. २२ सप्टेंबररोजी ताप आल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

6​सैराट

29 एप्रिल 2016 ला नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट सैराट प्रदर्शित झाला आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये जणू वादळच आलं.  बघता बघता सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली. सैराट ची खूप चर्चा झाली या अगोदर एवढं चर्चा कोणत्या मराठी चित्रपटा बद्दल झाली नव्हती.

5डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यात हिलरी क्लिंटन सारख्या अनुभवी राजकारणी व्यक्तीमत्वाला मात देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बनले. अनेक राजकिय विश्लेषकांची भाकिते आणि एक्सिट पोल साफ खोटे ठरवत या महासत्तेच्या गादीवर डोनाल्ड ट्रम्प जाऊन बसले.  त्यांच्या विजयाने अमेरिकाच काय पण संपूर्ण जगालाच धक्का बसला.

4मराठा क्रांती मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चांचं राज्यभरात आयोजन करण्यात आलं. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चे काढण्यात आले. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.दहा लाख, वीस लाख एवढा मोठ्या संख्येने लोक या मोर्चा ला सामील होऊन देखील एकदम शांततेत, शिस्तीत हे मोर्चे निघत होते हे विशेष.

3जिओ मोबाईल सेवा

रिलायन्स ने जिओ नावाची 4G सेवा लॉन्च केली. नवीन ग्राहकांना वेलकम ऑफर अतंर्गत जिओ ने 3 महिने सर्व सेवा मोफत दिल्या. एवढंच नाही तर 1 जानेवारी पासून कंपनी न्यू इयर नामक आणखी एक ऑफर देऊन लोकांना खुश केलं. या मुळे कंपनी चे सर्वात कमी रेकॉर्ड वेळेत 5 करोड पेक्षा जास्ती ग्राहक झाले आहेत. हे सिम घेण्यासाठी लोकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या म्हणून हे देखील या वर्षी च झिंगाट गोष्ट ठरली.

2सर्जिकल स्ट्राईक

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण लक्ष्य केले. या कारवाईला लष्कराने’सर्जिकल स्ट्राइक’म्हटले. भारतीय इतिहासात प्रथमच जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले आहे.या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

1नोटाबंदी

येणाऱ्या काळासाठी हे वर्ष नोटाबंदीचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. सामान्य माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा या वर्षातील हा सर्वात मोठा निर्णय ठरला. आठ नोव्हेंबरला एका घोषणेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्यात येतील हे सांगितले आणि १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या.

कशे वाटले हे 2016 मधील झिंगाट गोष्टी आवडले असतील तर atoz marathi च्या फेसबुक पेज लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.